*छावा क्रांतिवीर सेनेचे 11वे राष्ट्रीय महाअधिवेशन श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उत्साहात संपन्न!* कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे पंढरपूर : छावा
- dhadakkamgarunion0
- May 13
- 2 min read
*छावा क्रांतिवीर सेनेचे 11वे राष्ट्रीय महाअधिवेशन श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उत्साहात संपन्न!*
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे
पंढरपूर : छावा क्रांतिवीर सेनेचे अकरावे राष्ट्रीय महाअधिवेशन पवित्र श्रीक्षेत्र पंढरपूर येथे संपन्न झाले. छावाचे संस्थापक अध्यक्ष करण भाऊ गायकर व संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाने धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांची सर्वानूमते अधिवेशनाचा अध्यक्षपदाचा मान देण्यात आला.
अभिजीत राणे यांनी अध्यक्षीय भाषणात बोलताना, भारत हा कृषिप्रधान देश आहे. या देशाचा कणा म्हणजे आपले शेतकरी. आपल्या श्रमाने, घामाने आणि निष्ठेने तो देशाला अन्न पुरवतो. मात्र आज त्याच्या अडचणी, समस्या आणि त्याकडे पाहण्याची समाजाची दृष्टी याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. "एकजुटीत ताकद असते, आणि ही ताकद जर योग्य दिशेने वापरली गेली तर ती विकासाचं स्वप्न साकार करू शकते. सहकार ही अशीच एक संकल्पना आहे – जी सामान्य माणसाला एकत्र आणून सामूहिक उन्नती साधते. देशाची प्रगती ही फक्त धोरणांवर नव्हे, तर त्या धोरणांना कृतीत आणणाऱ्या कामगारांच्या कष्टावर अवलंबून असते. प्रत्येक ईंट, रस्ता, इमारत मागे कामगाराचं श्रमसामर्थ्य दडलेलं असतं. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. जर नागरिक निरोगी असतील, तरच देश बलवान आणि प्रगत होऊ शकतो. त्यामुळे आजच्या घडीला आरोग्य व्यवस्था, स्वच्छता आणि जनजागृती यावर भर देणं अत्यावश्यक झालं आहे. "शिक्षण हे फक्त पुस्तकापुरतं मर्यादित नसतं – ते व्यक्तिमत्त्व घडवतं, विचार देतं आणि जीवनाचं खऱ्या अर्थाने दिग्दर्शन करतं. शिक्षणाशिवाय विकासाचं स्वप्न अपूर्णच राहील. स्त्रिया म्हणजे केवळ कर्तव्यदक्ष माता, पत्नी किंवा कन्या नाहीत – त्या समाजाच्या उभारणीचा एक मजबूत आधार आहेत. त्यांच्या सक्षमीकरणाविना समाज प्रगती करू शकत नाही. विशेषतः कामगार कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असून, मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. या मुद्द्यांसाठी संघटनेला लागणारी सर्वतोपरी मदत माझ्याकडून केली जाईल. आगामी अधिवेशन मुंबई येथे घेण्यात आल्यास, त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य माझ्याकडून आपल्या संघटनेस करु. छावा क्रांतिवीर सेनेसोबत माझे ऋणानुबंध गेल्या अनेक वर्षांपासून जिव्हाळ्याचे आणि विश्वासाचे आहेत.संघटनेचा प्रत्येक उपक्रम मला आपल्या कुटुंबाचा वाटतो.सामाजिक क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या या संघटनेकडून भविष्यात सामान्य जनतेच्या प्रश्नांवर ठोस कार्य होईल,असा पूर्ण विश्वास व्यक्त करतो. असे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, माजी राज्यमंत्री दर्जा शेतकरी नेते रविकांत तुपकर, भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण, आमदार अभिजीत पाटील, म्हाडा विधानसभा समाधान आवताडे, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा यांसह निवेदक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#छावा_क्रांतिवीर_सेना #राष्ट्रीय_महाअधिवेशन #पंढरपूर2025 #अभिजीत_राणे #धडक_कामगार_युनियन #मराठा_आरक्षण #abhijeetrane #AR
































Comments