top of page

कामगार नेते अभिजीत राणे यांनी डॉ. अविनाश ढाकणे यांची सदिच्छा भेट!

11 minutes ago
1 min read

कामगार नेते अभिजीत राणे यांनी डॉ. अविनाश ढाकणे यांची सदिच्छा भेट!

मुंबईतील पर्यावरण संरक्षण या महत्त्वपूर्ण विषयांवर भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष व कामगार नेते अभिजीत राणे यांनी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश के. ढाकणे यांची सदिच्छा भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

वृक्षतोड व वृक्ष पुनर्रोपणाच्या परवानग्यांमध्ये वृक्ष प्राधिकरणाने घालून दिलेल्या वृक्षलागवडीच्या अटींचे पालन न करणाऱ्यांवर महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५ च्या कलम २१ अंतर्गत कठोर कारवाई करण्याऐवजी केवळ अनामत रक्कम जप्त करण्याच्या प्रकाराबाबत अभिजीत राणे यांनी लक्ष वेधले.

यावेळी अभिजीत राणे यांनी अविनाश ढाकणे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. व दोन्ही विषयांवर ठोस कार्यवाही व्हावी, ही अपेक्षा व्यक्त केली.

#अभिजीतराणे #अविनाशढाकणे #भाजपाकामगारआघाडी #AR #photo Devendra Fadnavis CMOMaharashtra BJP Maharashtra BJP Mumbai BMC MyBmc


 
 
 

Recent Posts

See All

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page