ऑल इंडिया आर एम एस / एम एम एस एम्प्लॉयज युनियन ग्रुप सी, महाराष्ट्र सर्कल मुंबई कडून युनियनचे सर्कल सचिव कॉ. एम. ए. देठे यांच्या जी पी ओ ऑडिटरीयम, मुंबई येथे कॉ. एस पी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली
- dhadakkamgarunion0
- May 30
- 1 min read
ऑल इंडिया आर एम एस / एम एम एस एम्प्लॉयज युनियन ग्रुप सी, महाराष्ट्र सर्कल मुंबई कडून युनियनचे सर्कल सचिव कॉ. एम. ए. देठे यांच्या जी पी ओ ऑडिटरीयम, मुंबई येथे कॉ. एस पी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली व युनियन च्या तमाम सभासदांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त सोहळ्यास आयोजकांच्या विनंतीस मान देऊन धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली व त्यांना पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना त्यांनी कॉ. एम. ए. देठे – एक समर्पित, कर्तव्यनिष्ठ आणि लढवय्या कामगार नेता, ज्यांनी आपल्या सेवाकाळात केवळ स्वतःचं काम उत्तम केलं नाही, तर असंख्य कामगारांच्या हक्कांसाठी लढा दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली युनियनने अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर यशस्वी आंदोलनं उभी केली आणि कामगार हितासाठी निर्णायक भूमिका बजावली. त्यांच्या योगदानाची छाप आपल्यावर कायम राहील. त्यांच्या अनुभवाचा फायदा येणाऱ्या पिढ्यांना मिळावा, हीच इच्छा. "धडक कामगार युनियन" कडून आणि माझ्यावतीने त्यांना भावपूर्ण शुभेच्छा देतो – की निवृत्तीनंतरही ते आरोग्यपूर्ण, आनंदी आणि सक्रीय जीवन जगोत अशा त्यांना शुभेच्छा!
#AbhijeetRane #धडककामगारयुनियन #MADethe #UnionLeader






















Comments