◆ धडक कामगार युनियन व मे. मायक्रो न्यमॅटीक प्रा. लि. मध्ये कामगार उप आयुक्त कार्यालयात सहाय्यक कामगार आयुक्त सं.म. कानडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या पुर्वनियोजीत बैठकी दरम्यान धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी वैशाली मेस्त्री यांना कंपनी प्रशासनाने जबरदस्तीने राजिनामा देण्यास भाग पाडले असून त्यांना पुन्हा कामावर घेण्याची मागणी केली.
◆ तसेच अल्पिता चौधरी यांना घशाचा दुर्धर आजार असून त्या पर्चेस विभागात काम करत होत्या परंतू त्यांची सुडबुध्दीने रिसेपशनिस्ट म्हणून बदली केली. तरी तिची बदली पुन्हा पर्चेस विभागामध्ये करण्यात यावी व व्यवस्थापनाकडून देण्यात येणारा मानसिक त्रास थांबवण्यात यावा अशी मागणी केली.
◆ युनियनच्या सभासदांना सुडबुध्दीने दबावतंत्राचा वापर केला जात असून तो त्वरीत थांबवण्यात यावा व पुढील बैठकीस व्यवस्थापन प्रतिनिधीने स्वतः उपस्थीत रहावे. अशी शासन पातळीवर नोंद करुन घेण्यात आली.











Comments