Prominent Labour Leader Abhijeet Rane while discussing the issues of Arnala Machchhimar Unit
◆ धडक कामगार युनियन व मे. अर्नाळा मच्छिमार विविध कार्यकारी संस्था या निमशासकीय संस्थेमध्ये कामगार उप आयुक्त कार्यालयात सहाय्यक कामगार आयुक्त सं.म. कानडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या पुर्वनियोजीत बैठकी दरम्यान,
◆ सन २०२०-२१ या अर्थिक वर्षाचा बोनस तात्काळ संस्थेची वार्षिक बैठक करून एका आठवड्याच्या आत कामगारांना अदा केली जाईल असे संस्था प्रशासनाकडून सांगण्यात आले होते परंतू कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे दिसून येते तरी बोनस प्रदान अधिनियम 1965 च्या तरतुदीनुसार कामगारांचा बोनस अदा करण्याबाबत कार्यवाही करून बैठकीत सर्वसंबंधित कागदपत्रांसह निर्णयक्षम अधिकार याने न चुकता उपस्थित रहावे असे आदेश सहाय्यक कामगार आयुक्त सं. म. कानडे यांनी संस्थेस काढले.
◆ ह्या संपुर्ण बाबींची शासनपातळीवर नोंद घेण्यात आली.



