सीकाॅम एम्पलाॅईज वेलफेअर असोसिएशन (SEWA) च्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त दि. 26 मार्च, 2021 रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व सीकाॅम एम्पलाॅईज वेलफेअर असोसिएशन (SEWA) चे अध्यक्ष विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनी भेट देऊन दर्शन घेतले.
यावेळी अभिजीत राणे यांची सीकाॅम एम्पलाॅईज वेलफेअर असोसिएशन (SEWA) च्या कामगारांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी SEWA च्या वतीने श्री अभिजीत राणे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
Comments