सस्नेह निमंत्रण! ---------- 🇮🇳 देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त भाजपा व धडक कामगार युनियनच्या माध्यमातून ‘भारतीय पोस्ट’कडून योजनांची माहिती देणारी कार्
- dhadakkamgarunion0
- 3 hours ago
- 1 min read
सस्नेह निमंत्रण!
----------
🇮🇳 देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त भाजपा व धडक कामगार युनियनच्या माध्यमातून ‘भारतीय पोस्ट’कडून योजनांची माहिती देणारी कार्यशाळा!
🗓 *बुधवार दि. १७ सप्टेंबर २०२५, सकाळी 11 वाजता*
-------
📍 ठिकाण:
धडक कामगार युनियन महासंघ कार्यालय, ऑफिस ऑफ फायर ब्रिगेड, संकर्ण स्टुडिओ जवळ, आरे मिल्क कॉलनी, युनिट नं.2,
महाराष्ट्र कृषि उद्योग भवन समोर, गोरेगाव (प), मुंबई – 400065
======
*सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF):*
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आणि मोठे भांडवल उभारण्यासाठी ही योजना फायदेशीर आहे.
*सुकन्या समृद्धी योजना (SSY):*
१० वर्षांखालील मुलींसाठी ही योजना असून, त्यांचे शिक्षण, आरोग्य आणि लग्नासाठी बचत करण्यास मदत करते.
*राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC):*
ही एक सरकारी हमी असलेली योजना आहे, जी कमी जोखमीसह चांगले उत्पन्न देते.
*किसान विकास पत्र (KVP):*
या योजनेत तुमची गुंतवणूक ठराविक मुदतीत दुप्पट होते.
*पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS):*
या योजनेतून दरमहा नियमित उत्पन्न मिळते, जे नियमित गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त आहे.
*ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS):*
ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेषत: तयार केलेली ही योजना असून, ती सुरक्षित परतावा देते.
*पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD):*
ही योजना नियमित मासिक गुंतवणुकीद्वारे मोठी रक्कम जमा करण्यासाठी वापरली जाते.
🙏 सर्वांचे सहर्ष स्वागत!

Comments