ठाणे येथील जुगार व मटका याबाबतीत सविस्तर वृत्तांत ‘दै. मुंबई मित्र’ मध्ये मागील महिन्याभरापासून प्रसिध्द करण्यात येत आहे. याबाबतीत अधिकृत तक्रारी सुद्धा ‘दै. मुंबई मित्र’ने संबंधीत विभागांना दिल्या आह
- dhadakkamgarunion0
- Aug 12
- 1 min read
ठाणे येथील जुगार व मटका याबाबतीत सविस्तर वृत्तांत ‘दै. मुंबई मित्र’ मध्ये मागील महिन्याभरापासून प्रसिध्द करण्यात येत आहे. याबाबतीत अधिकृत तक्रारी सुद्धा ‘दै. मुंबई मित्र’ने संबंधीत विभागांना दिल्या आहेत. परंतू यावर ठोस कारवाई अद्याप झाली नव्हती त्यासाठी आज ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची ‘दै. मुंबई मित्र’चे समुह संपादक अभिजीत राणे यांनी भेट घेतली व चर्चा केली. यावेळी 'दै. मुंबई मित्र'च्या माध्यमातून उघड झालेल्या ठाण्यातील जुगार-मटका प्रकरणांवर गंभीर लक्ष देऊन, पोलीस प्रशासनाने त्वरित आणि कठोर कारवाई करण्यासाठी दिशा निश्चित केली असून, जुगाराचे सामाजिक व गुन्हेगारी परिणाम टाळण्याची कर्तव्यदक्ष पावले सुरू झाली आहेत. असे आश्वासन त्यांनी दिले. अभिजीत राणे यांनी यावेळी त्यांचा शाल घालुण सत्कार केला.












Comments