धडक कामगार युनयिनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी स्मृतिशेष अनुष्का अंकुश हिवाळे यांना वाहिली श्रद्धांजली व अंकुश हिवाळे आणि परिवाराचे केले सांत्वन
रिपब्लीकन पक्षाचे उत्तर मध्य मुंबई जिल्हा सचिव आय.टी.सेल जिल्हा अध्यक्ष अंकुश हिवाळे यांची मुलगी स्मृतिशेष कुमारी अनुष्का अंकुश हिवाळे हीचे 11 ऑगस्ट, 2022 रोजी अल्पशा आजाराने दुखद निधन झाले होते. तिचा पुण्यनुमोदन कार्यक्रम 13 ऑगस्ट, 2022 रोजी विश्वशांती बुद्ध विहार संकुल क्र. 19 संघर्ष नगर, चांदिवली येथे पार पडला.
यावेळी स्मृतिशेष अनुष्का अंकुश हिवाळे हिला धडक कामगार युनयिनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी श्रद्धांजली वाहिली तसेच अंकुश हिवाळे यांचे व त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले. पुण्यनुमोदन कार्यक्रमाला माजी नगरसेवक ईश्वर तायडे, रिपब्लीकन नेते ज्ञानमित्र घनश्याम चिरणकर, प्रकाश जाधव, तानाजी कांबळे, किशन रोकडे, सोना कांबळे, दादु भोसले, अभय पवार, दै. मुंबई मित्रचे वितरण व्यवस्थापक नितिन खेतले, सुजाता राजगुरु, नारायण हिवाळे आदि उपस्थित होते. एस.एस. दामोदर गुरुजी यांनी विधिसंचलन केले.
Comments