यावर्षी आपण स्वातंत्र्याची 75 वर्ष अमृत महोत्सव म्हणुन साजरा करीत आहोत. हा दिवस भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे.आपल्या सर्वस्वाचा त्याग करुन बलिदान देणा-या हजारो ज्ञात,अज्ञात भारत मातेच्या वीर सपूत्रांना अभिवादन करतो आणि समस्त देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. असे प्रतिपादन धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी केले.
आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त धडक कामगार युनियनच्या गोरेगाव येथील मुख्य कार्यालयासमोरील प्रांगणात ध्वजारोहण केल्या नंतर विख्यात कामगार नेते अभिजीत राणे बोलत होते.ते पुढे म्हणाले केंद्र आणि राज्यामध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. हर घर तिरंगा ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी मांडली आणि देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे.
केंद्र आणि राज्य सरकारची समस्त कामगारांच्याबाबतीत विशेष दुरदृष्टि आहे. कामगारांच्या प्रति सहानुभूती बाळगणारी ही दोन्ही सरकारे आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातुन देशभरातील समस्त श्रमिक, कष्टकरी, कामगार आणि उपेक्षित वर्गाला न्याय मिळेल असा विश्वास धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी व्यक्त केला.
धडक कामगार युनियनच्या मुख्य कार्यालयासमोरील प्रांगणात पार पडलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्यासह वास्ट मिडीया नेटवर्क प्रा.लि. कंपनीचे सी.ई.ओ. अमोल राणे, धडक कामगार युनियन सेल्स टॅक्स विभाग युनिट अध्यक्ष झुल्लुर यादव, बी.के. पांडे, विशाल मोरे, तानाजी कांबळे, हसमुख ॲण्ड कंपनी पी.जी. युनिट अध्यक्ष सत्यविजय सावंत, विनोद मल्लाह, कुणाल जाधव, मुंबई उपाध्यक्ष व नवी मुंबई /ठाणे निरीक्षक बबन आगडे, द ट्रक डंपर टेम्पो ओनर्स असोसिएशनचे मुंबई अध्यक्ष अश्रुबा गायकवाड, रवि बनसोडे, नितिन खेतले, अर्जुन म्हादळकर, सचिन महाडिक, पी.व्ही.आर. युनिट कर्मचारी प्रविंद चव्हाण, शिला जाधव, जल्लपा पुनम व अन्य सभासद, पदाधिकारी उपस्थित होते.
Bình luận