विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना विश्व प्रसिद्ध मृंदगाचार्य पंडित भवानी शंकर कथ्थक यांचे आर्शीवाद
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या कामगार क्षेत्रातील धडाडीच्या योगदानाला विश्व प्रसिद्ध मृंदगाचार्य पंडित भवानी शंकर कथ्थक यांनी आर्शीवाद दिले. आरे मिल्क काॅलनी, गोरेगाव पूर्व,मुंबई येथील धडक कामगार युनियनच्या कार्यालयात त्यांनी अभिजीत राणे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांचे पुत्र कोरियोग्राफर नरेश कथ्थक उपस्थित होते. या वेळी अभिजीत राणे यांनी विश्व प्रसिद्ध मृंदगाचार्य पंडित भवानी शंकर कथ्थक यांच्या कलेचा गौरव म्हणुन त्यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला.
Comentários