धडक दिव्यांग मूकबधिर कामगार युनियन कडून जागतिक दिव्यांग दिन गोरेगाव येथे उत्साहात साजरा!
कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ममतामयी राधे माँ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना ब्लॅंकेट तसेच मुलांना शालेय वया व दप्तराचे वाटप!
मुंबई व उपनगर परिसरातील शेकडों दिव्यांग बांधवांनी घेतले धडक कामगार युनियनचे प्रतिनिधित्व
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
धडक दिव्यांग मूकबधिर कामगार युनियन कडून जागतिक दिव्यांग दिन गोरेगाव येथे उत्साहात साजरा!
कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ममतामयी श्री राधे गुरू माँ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना ब्लॅंकेट तसेच मुलांना शालेय वया व दप्तराचे वाटप!
मुंबई व उपनगर परिसरातील शेकडों दिव्यांग बांधवांनी घेतले धडक कामगार युनियनचे प्रतिनिधित्व
मुंबई (गोरेगाव) : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून धडक दिव्यांग मूकबधिर कामगार युनियन कडून आज मोठ्या उत्साहात 'सस्नेह मेळावा' पार पडला. धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ममतामयी राधे माँ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना ब्लॅंकेट तसेच मुलांना शालेय वया व दप्तराचे वाटप करण्यात आले. यावेळी ममतामयी श्री राधे गुरू माँ चॅरिटेबल ट्रस्टकडून ट्रस्टचे टल्ली बाबा यांची प्रमुख उपस्थिती होती. दिव्यांग बांधवांचा शेकडोंचा जनसमुदाय यावेळी कार्यक्रमास उपस्थित होता.
कामगार नेते अभिजीत राणे यांनी यावेळी बोलताना, नोकरी व कामावर दिव्यांगांच्या अनेक समस्या असून तत्याबाबतीत मोठ्याप्रमाणात तक्रारी येत असतात परंतु त्यांना शासनाकडून म्हणावा तसा सहयोग मिळत नाही. त्यांना ताकद देण्याचे काम धडक दिव्यांग मूकबधिर कामगार युनियनच्या माध्यमातून केला जाईल असे यावेळी ते म्हणाले.
विशेष अतिथी म्हणून उपस्थित ममतामयी श्री राधे गुरू माँ चॅरिटेबल ट्रस्ट चे टल्ली बाबा यांनी यावेळी बोलताना, श्री राधे माँ ट्रस्ट च्या माध्यमातून देशभरात आम्ही विविध समाजउपयोगी कार्यक्रम केले जात असतात आज कामगार नेते अभिजीत राणे यांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना फुल न फुलाची पाकळी अशी मदत देण्याचा योग जुळून आला. राधे माँ प्रत्येक शोषित पीडित व गरजूंच्या पाठीशी उभी असते आजच्या कार्यक्रमाबद्दल मी धडक कामगार युनियनचे विशेष आभार मानतो.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युनियनचे युनिट अध्यक्ष महेश पवार व त्यांच्या टीम ने खूप मेहनत घेतली तसेच धडक कामगार युनियनच्या कार्यालयाच्या आरती सावंत, ऋतुजा कोरगावकर तसेच दै. मुंबई मित्र चे वितरण व्यवस्थापक नितीन खेतले, अर्जुन महाडदलकर, सचिन महाडिक, बबन आगडे, अभिषेक चव्हाण यांनी विशेष मेहनत घेतली.
Comments