धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी कार्निवल सिनेमाजच्या मुख्य कार्यालयास आयोजित नियोजित बैठकीस कामगारांची बाजू मांडण्यासाठी प्रमुख उपस्थिती लावली. यावेळी अभिजीत राणे व कंपनी प्रशासनामध्ये कामगारांचे थकीत वेतन, पी.एफ., ई.एस.आय.सी, ग्रेच्युटी, मेडीकल अलाउंस तसेच फुल ऍन्ड फायनल रक्कम देण्यासंदर्भात चर्चा पार पडली. यावेळी अभिजीत राणे यांनी कामगारांची बाजू उचलून धरत प्रशासनाकडून मागील अनेक महिन्यांपासून होत असलेली चालढकल याबाबतीत प्रशासनास जाब विचारला, यावेळी पुन्हा असे घडू नये म्हणुन कामगार व कंपनी प्रशासन यामध्ये अभिजीत राणे यांच्या समोर लेखी अनौपचारिक करार करण्यात आला व संबंधित मागण्यांची पूर्तता करण्यासंदर्भात एक वेळ व तारीख निश्चित करण्यात आली. यावेळी कामगारांनी कामगार नेते अभिजीत राणे यांचे आभार मानले.
top of page
bottom of page
Comentarios