top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Dhadak Real Estate Agents Association

धडक कामगार युनियन महासंघ अंतर्गत धडक रियल इस्टेट एजंट असोसिएशनची पूर्व नियोजित बैठक गोरेगावस्थित धडक भवन कार्यालयात धडक कामगार युनियन महासंघाचे अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. धडक कामगार युनियन महासंघ (महिला विंग)च्या महाराष्ट्र उपाध्यक्ष पूनम ओबेराॅय यांनी बैठकीचे आयोजन केले होते, यावेळी मीरा भाईंदर व ठाणे ग्रामीण परिसरातील प्रापर्टी डीलर्सनी उपस्थिती दर्शवली. अभिजीत राणे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, आज पासुन आपण एकटे नाहीत आपल्या पाठीशी धडक कामगार युनियन महासंघच्या साडे सात लाख कामगारांची ताकद उभी आहे. धडक कामगार युनियन महासंघ आपल्याबरोबर सर्व परिस्थितीत आपल्यासोबत राहणार आहे, असे आश्वासन दिले.


117 views0 comments

Comments


bottom of page