धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते मा.श्री अभिजीत राणे यांची मध्यवर्ती दुग्धशाळा आरे, वरळी व कुर्ला महाव्यवस्थापकांशी मध्यवर्ती दुग्धशाळा, आरे येथील आरे डेरी कामगारांच्या प्रश्नां विषयी महत्वपूर्ण चर्चा संपन्न
दि. 23 ऑगस्ट, 2022 रोजी मध्यवर्ती दुग्धशाळा आरे येथे धडक कामगार युनियनच्या वतीने संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी नितीन बडगुजर (महाव्यवस्थापक- मध्यवर्ती दुग्धशाळा आरे, वरळी व कुर्ला ) यांचाशी मध्यवर्ती दुग्धशाळा, आरे येथील आरे डेरीच्या कामगारांच्या विविध प्रश्नां विषयी महत्वपूर्ण चर्चा केली.
या वेळी आरे चे मुख्य कार्यकारी अधिकारी पवार,आरे सुरक्षा अधिकारी पवार,डेप्युटी डेअरी मॅनेजर राजपूत उपस्थित होते.
सदर मिटींगमध्ये कामागारांच्या समस्या व प्रश्नांनबाबत महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली.आरे डेअरी येथील कामगारांना गणवेश, गमबुट देण्यात यावा, तसेच महिन्याच्या पहिल्या आठवडयात कामगारकांना पगार देण्यात यावा, बंद असलेले उपहार गृह चालू करण्या बाबत, थकित पेड हाॅलीडे देण्या बाबत, महिला कामगारांसाठी विश्रामगृह देण्याबाबत, अतिरिक्त कामगारांना समायोजन करण्या बाबत,आरे रुग्णालय तीनही शिफ्ट मध्ये कामगारांसाठी डाॅक्टर आणि नर्स उपलब्ध करण्याबाबत, आरे डेअरी मध्ये काही मशीनरी बंद पडल्या आहेत.त्या रिपेअरींग साठी मशीनरींचा पार्ट मिळत नाही, हया सर्व मशीनरींना व इक्वीपमेंट लवकारत लवकर रिपेअर करुन मशीनरीला ऑपरेट करण्यासाठी स्कील कामगार नियुक्त करण्यात आला पाहिजे.अशा विविध मागण्या महाव्यवस्थापक यांच्या समोर विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी मांडल्या.मध्यवर्ती दुग्धशाळा आरे, वरळी व कुर्ला चे महाव्यवस्थापक
यांनी लवकरात लवकर सदर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले.
सदर मिटींगच्या दरम्यान रविंद्र जगताप,सुरेश खंडागळे, झुल्लुर यादव, महेंद्र गांगुर्डे, चंद्रकांत चव्हाण, महादेव बापू वळकुंडे, ताहीद अंसारी, मुर्गन तंगवेल, दिलीप प्रधान, प्रदीप कांबळे, दिलीप पाटील, राजू पाटील, सुधाकर, राजेंद्र लोखंडे, धनलक्ष्मी, ज्योति पेरीस्वामी व आरे डेरी येथील कामगार व धडक कामगार युनियनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments