विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालकांच्या विविध प्रश्नांवर मुंबई वाहतुक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डाॅ. श्री महेश पाटिल यांची घेतली भेट
मुंबई | प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या संकटामुळे अडचणीत सापडलेले ऑटो रिक्शा टॅक्सी चालक या धंदयाच्या माध्यमातुन आपल्या कुटुंबियांचा उदर निर्वाह करीत आहेत. धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालकांचे प्रश्न व समस्या या बाबत धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी मुंबई वाहतुक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डाॅ. महेश पाटील यांची भेट घेऊन विविध विषयांवर व्यापक चर्चा केली.
धडक आऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्या माध्यमातुन मुंबईतील हजारो ऑटो रिक्शा व टॅक्सी चालक मालकांचे धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे नेतृत्व करीत आहेत. ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक सातत्याने वाहतुक पोलिसांकडुन होत असलेल्या बेकायदेशीर ऑनलाईन फाईन व अन्य बाबत तक्रारी करत होते.
दि. 28 जून, 2022 रोजी धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी मुंबई वाहतुक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डाॅ. श्री महेश पाटिल यांची भेट घेऊन धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालकांना येणा-या अडचणी व समस्या तसेच बेकायदेशीर ऑनलाईन फाईन बाबत चर्चा केली. वाहतुक पोलिस जाणुनबुझुन फाईनची भिती दाखवुन मनमानी करुन पैसे वसुल करीत असतात. एखाद्या रिक्शा चालकाने आॅन द स्पाॅट पैसे भरले तर त्याला शंभर ते दोन सै रुपये फाईन घेऊन चलन न देता सोडुन देतात. रिक्शा टॅक्सी चालकांचे म्हणणे ऐकुन ही घेतले जात नाही. रोडच्या बाजूला प्रवाश्यांना उतरविण्यासाठी रिक्शा टॅक्सी थांबवतो, भाडे घेण्यासाठी थांबलेला असतो तेव्हा त्याचा रिक्शा टॅक्सीचा मागुन फोटो काढुन फाईन मारण्यात येतो. तसेच गाडी पासिंग करण्यासाठी प्रत्येक दिवशी 50 रुपये फाईन मारण्यात येतो.या सर्व प्रकारामुळे रिक्शा टॅक्सी चालक मालक हवालदिल असुन चिंताग्रस्त आहे. वरील सर्व मुद्यांवर युनियनचे संस्थापक महासचिव
विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी गांभीर्यान चर्चा केली.
धडक आॅटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनशी संबंधित आॅटो रिक्शा टॅक्सी चालक मालक यांचे प्रश्न व समस्या तसेच तक्रारी समजुन घेतल्या नंतर मुंबई वाहतुक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डाॅ. श्री महेश पाटिल यांनी सकारात्क चर्चा करुन संबंधितांना सुचना आदेश देण्यात येतील असे आश्वासन धडक आॅटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना दिले.या वेळी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी विविध मागण्यांचे निवेदन देवून अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ महेश पाटील यांचा शाल देऊन सत्कार केला.








Comments