top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane Chief Guest at Hindvi Swarajya Sanghtana

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, दै. मुंबई मित्र व दै. वृत्त मित्र या वर्तमानपत्रांचे समुह संपादक विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी शनिवार दि.30 एप्रिल, 2022 रोजी हुतात्मा बाबू गेनू स्मारक, कामगार मैदान जवळ, परळ, मुंबई येथे हिंदवी स्वराज्य संघटना आयोजित महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त शिव सन्मान, जिजाऊ सन्मान व महाराष्ट्र सन्मान -2022 पुरस्कार वितरण सोहळयात प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती लावली. यावेळी कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते पुरस्कार्थ्यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सुरज भोईर (कार्याध्यक्ष-हिंदवी स्वराज्य संघटना) यांच्या हस्ते कामगार नेते अभिजीत राणे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.




















7 views0 comments

Commentaires


bottom of page