विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन, समुह संपादक - दै. मुंबई मित्र / दै. वृत्त मित्र) यांनी अखिल भारतीय मराठा महासंघ, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा यांच्या तर्फे आयोजित "सन २०२३ दिनदर्शिका प्रकाशन सोहळयात" प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री. सचिन शिंदे यांच्या हस्ते विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार श्री. प्रकाशभाऊ फातर्पेकर, श्री. अनिल पाटणकर (माजी बेस्ट अध्यक्ष), समाजसेवक श्री. आशिष गडकरी, भाजपा मुंबई उपाध्यक्ष श्री. अनिल ठाकुर, सौ. भारती ताई पाटिल, सौ. मंजुषा ताई परब, मुंबई अध्यक्ष श्री. नरेश मोरे, महामुंबई अध्यक्ष श्री. प्रविणभाऊ पवार, सचिव श्री. श्यामराव मोहिते व अन्य मान्यवर उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दक्षिण-मध्य मुंबईचे सरचिटणीस श्री. सुधीर पाटील यांनी केले.












Kommentit