◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज सहाय्यक कामगार आयुक्त मुंबई सतीश तोटावर यांच्या कार्यालय येथे धडक कामगार युनियनच्या हसमुख एंड कंपनी पी.जी. युनिट च्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांसंदर्भात आयोजित नियोजित बैठकीस हजेरी लावली व कामगारांच्या समस्या मांडल्या. यावेळी मोठ्याप्रमाणात कामगार उपस्थित होते. युनियनकडून बाजू मांडताना कामगारांची प्रशासनाकडून केली जाणारी पिळवणूक आदी विषयांची शासनपातळीवर नोंद घेण्यात आली. कामगार 7 नोव्हेंबर, 2022 पासुन आज पर्यंत संपावर आहेत. व्यवस्थापनेच्या बाजूने ऍड ठाकुर उपस्थित होते. युनियनच्या माध्यमातुन कामगारांचे दोन-तीन महिन्यांचे थकबाकी पगार देण्याची मागणी करण्यात आली. तसेच कामगारांचे मागण्यांबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे ते मान्य करण्याबाबत ही सविस्तर चर्चा करण्यात आली.
top of page
bottom of page
Comentarios