Labour Leader Abhijeet Rane meeting with Police Inspector In Charge Maruti Lad (Dahisar Traffic)
◆धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजित राणे यांनी दहिसर वाहतुक पोलिस ठाणेचे प्रभारी पोलिस निरीक्षक मारुती लाड यांची भेट घेतली. यावेळी संजय गांधी नॅशलन पार्क गेट टॅक्सी विभाग कमिटीच्या प्रश्न व समस्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. दहिसर वाहतुक पोलिस ठाणेचे प्रभारी पोलिस निरीक्षक मारुती लाड यांनी रिक्शा टॅक्सी चालकांच्या प्रश्न व समस्यांवर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी दहिसर वाहतुक पोलिस ठाणेचे प्रभारी पोलिस निरीक्षक मारुती लाड यांचा शाल घालुन सत्कार केला. यावेळी धडक कामगार युनियनचे मुंबई सचिव रवि बनसोडे व संजय गांधी नॅशनल पार्क विभाग कमिटीचे सभासद उपस्थित होते.





