मुंबईसह एम.एम.आर. विभागातील रिक्षा व टॅक्सी धारकांच्या भाडे वाढ व इतर अडचणीबाबत माननिय श्री. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांच्या सोबत लवकर सर्व संघटनांची बैठक होणार आहे या बैठकीत मध्ये सर्व रिक्षा टॅक्सी संघठनांनी एकत्र येवून माननिय मुख्यमंत्र्यांकडे एकमताने व ऐका विचाराने आपल्या धारकांसाठी भाडे वाढ व इतर अडचणीबाबत चर्चा करावी यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेने च्या कार्यालयात काही संघटनाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे संस्थापक महासचिव श्री. अभिजीत राणे, टॅक्सी मेन्स युनियनचे श्री. फ्रेड्रिक डिसा, रिक्षा मेन्स युनियनचे श्री. तंबी कुरियन, महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे श्री. राजन देसाई, रिक्षा चालक मालक असोशियनचे श्री. संतोष नवले यांच्यासोबत बैठकिसाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते.
Comments