.विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक कामगार युनियन, समुह संपादक - दै. मुंबई मित्र, दै. वृत्त मित्र) यांच्या मुख्य उपस्थितीत आरे विश्व निसर्ग संगोपन आणि पर्यावरण फाउंडेशन नियोजित व मेवाड जैन स्थानकवासी संघ, व्यापारी मंडळ यांच्या सहकार्याने आयोजित शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपणाचा कार्यक्रम दि. 22 जानेवारी, 2023 रोजी गौतम नगर, आरे काॅलनी, गोरेगाव पूर्व, मुंबई येथे पार पडला. या कार्यक्रमात विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांचा भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू , पौत्र आनंदराज आंबेडर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात धडक कामगार युनियन आरे मध्यवर्ती दुग्धशाळा युनिट कार्याध्यक्ष सुरेश खंडागळे, महादेव वळकुंटे, महेंद्र गांगुर्डे व अन्य सभासद उपस्थित होते.
top of page
bottom of page
Comentarios