◆ धडक कामगार युनियन अंतर्गत धडक हॉटेल अँड रेस्टॉरंट कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हॉटेल 'सिली बिली'च्या प्रशासनाकडून कामगारांना त्यांचा पगार व बाकी बाबी देण्याचे मान्य केले. आज याबाबतीत कस्तुरबा पोलीस ठाण्यात चर्चा पार पडली यावेळी धडक कामगार युनियनचे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव यांच्या उपस्थितीत कंपनी प्रशासनाकडून काही रक्कम कामगारांना देण्यात आली व उर्वरित थकीत रक्कम सोमवारी देण्याचे कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
यावेळी उपस्थित कामगारांनी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांचे आभार मानले. तसेच विशेष करून युनिटच्या अध्यक्ष शबिना शेख यांनी कामगार नेते अभिजीत राणे यांचे आभार मानताना, साहेबांमुळेच आम्हाला लढण्याचे बळ मिळते त्यांचा आशिर्वाद पाठीशी रहावा हीच ईच्छा! असे यावेळी त्या म्हणाल्या.
ความคิดเห็น