◆ कामगारांचा विजय! संप मागे! --------- ◆ धडक कामगार युनियनच्या अर्नाळा मच्छिमार विविध कार्यकारी संस्था मर्या. संस्था युनिटच्या कामगारांच्या मागण्या संस्थेकडून मान्य! ------ ◆ कामगार नेते अभिजीत राणे व संस्थेचे अध्यक्ष रोहिदास पाटील व सल्लागार मंडळामध्ये सकारात्मक चर्चा! ---------- वसई (अर्नाळा) : धडक कामगार युनियनच्या अर्नाळा मच्छिमार विविध कार्यकारी संस्था मर्या. युनिट कामगारांनी युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली 31 ऑगस्ट पासून संप घोषित केला होता. त्याबाबत आज संस्थेकडून चर्चेचे आमंत्रण आलेले होते, त्या पार्श्वभूमीवर आज संस्थेत आयोजित केलेल्या नियोजित बैठकीस धडक कामगार युनियन ने उपस्थिती लावली. धडक कामगार युनियनकडून संस्थेस पाठवलेल्या चार्टड ऑफ डिमांड मध्ये 11 मागण्या करण्यात आल्या होत्या. ज्यावर युनियन व संस्था व सल्लागार मंडळामध्ये सकारात्मक चर्चा पार पडली. ज्यामध्ये कामगारांना 3500 पगारवाढ मान्य करण्यात आली. वार्षिक वाढ 10 टक्के करण्यात आली. कामगारांना वयक्तिक कर्जासाठी रुपये 50,000/- मान्य करण्यात आले. वार्षिक सहलीसाठी 30,000/- मान्य करण्यात आले. तसेच बाकी 9 मागण्यांवर सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा पार पडली. यावेळी संस्थेकडून येणाऱ्या 7 नोव्हेंबर च्या आत अधिकृत करार करण्यात येईल असे मान्य करण्यात आले व कामगारांना संस्थेकडून कामगारांना संप मागे घेण्याची विनंती करण्यात आली. चर्चे दरम्यान धडक कामगार युनियनकडून युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे, महाराष्ट्र उपाध्यक्ष उत्तम कुमार, जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव, युनियनच्या पालघर जिल्हा महिला प्रमुख सुदीप्ती सिंग, नितीन खेतले आदी मान्यवर उपस्थित होते. तर संस्थेकडून अध्यक्ष रोहिदास पाटील, उपाध्यक्ष मोहन चाचुल्या, संचालक मंडळाचे वसंत खारकांडी, भालचंद्र भगत, गजानन कोळी, नवनाथ परेकर, कल्याण हरक्या, जगदीश खेल्या, अनिल कोळी आदी उपस्थित होते. दरम्यान, अनौपचारिक कार्यक्रमादरम्यान कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित कामगारांना संबोधित करताना, युनियन कामगारांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभी आहे. मी संस्थेचे ही आभार मानतो की, त्यांनी कामगारांच्या मानण्या मान्य केल्या. कामगार व संस्थेच्या संचालक मंडळामध्ये झालेल्या काही दुराव्यामुळे आज ही संपाची परिस्थिती उदभवली परंतु यापुढे कामगारांनी संस्थेसाठी मनापासून काम करावे अशा शुभेच्छा देतो असे यावेळी ते म्हणाले. संस्थेचे अध्यक्ष रोहिदास पाटील यांनी यावेळी बोलताना, संस्थेची परिस्थिती तशी बरी नाही तरी कामगारांची पगारवाढ व काही मागण्या तूर्तास मान्य केल्या आहेत. तरी कामगारांनी कामावर रुजू व्हावे अशी विनंती आहे. असे यावेळी ते म्हणाले. उत्तम कुमार यांनी यावेळी बोलताना, सर्व आपण एकाच गावातील आहात त्यामुळे एकत्रित येऊन गावाचा विकास कसा होईल या दृष्टीने पुढे प्रयत्न करावे .असे यावेळी ते म्हणाले. यावेळी कामगारांमध्ये भूषण कोळी, मिना तांडेल, अनिल घरत, प्रभाकर पाटील, गणेश वर्मा, जितेंद्र पाटील, हेमेश चावरे, विनोद मेहेर, अशोक पाटील, भास्कर वझे, नारायण भोईर, कॅनेट गुरंग्या, संजय कुडू, गणेश पाटील, अनिल यादव, रमाकांत कुडू, राजेश कनोजिया आदी कामगार उपस्थित होते.
top of page
bottom of page
Comentários