top of page

Abhijeet Rane meeting with the residents of Shravan Nagar, Charkop regarding their issues of SRA

Updated: Sep 26, 2022

दै. मुंबई मित्र व दै. वृत्त मित्रचे समुह संपादक व धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज कांदिवली पश्चिम चारकोप येथील श्रावण नगरच्या रहिवाश्यांची त्यांच्या समस्यांसंदर्भात भेट घेतली. यावेळी श्रावण नगरच्या रहिवाश्यांनी अभिजीत राणे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी झालेल्या चर्चे दरम्यान श्रावण नगर रहिवाश्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणच्या माध्यमातुन व स्थानिक विकासकाकडुन होत असलेल्या अनागोंधी कारबारासंदर्भातील समस्यांचे गा-हाणे मांडले. यावेळी अभिजीत राणे यांनी रहिवाश्यांना आश्वस्त करत, ही लढाई कायदेशीर असून मला कायद्यावर पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळे आपण केव्हाही कायदा हातात घेणार नाही, हे प्रथम ठरवा. तसेच वर्तमानपत्र व माझी युनियन आपल्या पाठीशी ठामपणे उभी आहे. यापुढील लढाई कष्याप्रकारे लढायची आहे व जिंकायची आहे हे मला ठाऊक आहे. आज मी तुम्हाला फक्त प्रोत्साहन दयायला आलो आहे, असे यावेळी ते म्हणाले.

यावेळी सोबत अभिजीत भोईटे (महाराष्ट्र उपाध्यक्ष - अभिजीत राणे युथ फाउंडेशन), कुणाल जाधव(जनसंपर्क प्रमुख - धडक कामगार युनियन), विन्स्टन परेरा (महाराष्ट्र सचिव - धडक कामगार युनियन महासंघ), बबन आगडे (मुंबई उपाध्यक्ष, ठाणे व नवीमुंबई निरीक्षक - धडक कामगार युनियन), प्रदीप गोंड ( उत्तर मुंबई अध्यक्ष धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) व मोठ्या प्रमाणात श्रावण नगर रहिवाशी उपस्थित होते.

ree

ree

ree

ree

ree

ree

ree

ree

ree

ree

ree

ree

ree


 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page