३० वर्षे एकाच परिवाराची सत्ता होती, आता जनतेची सत्ता : राजन नाईक ----- राजन नाईक म्हणजे वसई-विरारकरांचा व आपल्या सर्वांचा "हक्काचा माणूस": अभिजीत राणे ----- अर्ध्या हळकुंडाणे पिवळा होणारा भाजपाचा कार्
- dhadakkamgarunion0
- Aug 15
- 2 min read
३० वर्षे एकाच परिवाराची सत्ता होती, आता जनतेची सत्ता : राजन नाईक
-----
राजन नाईक म्हणजे वसई-विरारकरांचा व आपल्या सर्वांचा "हक्काचा माणूस": अभिजीत राणे
-----
अर्ध्या हळकुंडाणे पिवळा होणारा भाजपाचा कार्यकर्ता नाही: उत्तम कुमार
-----
वसईत धडक कामगार युनियन आयोजित कार्यक्रम उत्साहात संपन्न!
---
वसई : धडक कामगार युनियन च्या माध्यमातून वसई विरार महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी व आशा सेविकांना मोफत छत्री वाटप व जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक व धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे, शिवसेना नेते नवीन दुबे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तर विशेष अतिथी म्हणून विशालनगरचे माजी नगरसेवक दिनेश भानुशाली, संतोष घाग व भाजपाचे जिल्हा महासचिव जोगेंद्रप्रसाद चौबे, मराठा समाजाचे सक्रिय कार्यकर्ते प्रकाश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. धडक कामगार युनियन चे उपाध्यक्ष व भाजपा महाराष्ट्र प्रदेश, केरळ प्रकोष्ट चे संयोजक उत्तम कुमार, यांनी कार्यक्रमाचे मुख्य आयोजन केले होते.
राजन नाईक यांनी यावेळी बोलताना, कार्यक्रमाचे आयोजक उत्तम कुमार हे ' धडक कामगार युनियन ' च्या माध्यमातून उत्तम कार्य करत आहेत. अभिजीत राणे यांनी कोरोना काळात केलेली मदत येथील जनता कधीच विसरू शकत नाहीत. गेले ३० वर्षे येथे एकाच परिवाराची सत्ता होती. आता भाजप परिवाराची ताकद ही जनतेची सत्ता बनली आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्यात आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशभरात चांगले काम सुरू आहे.
अभिजीत राणे यांनी यावेळी बोलताना, राजन नाईक यांनी अनेक वर्षे पक्षासाठी दिली. एक निष्ठेने वसई-विरार मध्ये भाजपचा झेंडा डौलात फडकत ठेवला. बऱ्याच दिवसांपासून सत्कार करायची इच्छा उत्तम कुमार व्यक्त करत होते. राजन नाईक वसई-विरारकर व आपल्या सर्वांचा हक्काचा माणूस असून आमचे जुने नाते आहे. माजी नगरसेवक दिनेश भानुशाली, स्थानिक नेते संतोष घाग यांनी आता पक्षात प्रवेश केला असून ते पक्षाची ताकद नक्कीच वाढवतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली 'धडक कामगार युनियन महासंघ' महाराष्ट्रभर कार्यरत असून राजन नाईक जेव्हा हाक मारतील तेव्हा त्यांच्या पाठीमागे ७ लाख कामगारांची ही युनियन उभी राहील, अशी ग्वाही देतो आहे. असे यावेळी ते म्हणाले.
नवीन दुबे यांनी उपस्थितांना संबोधित करताना, अभिजीत राणेजी हे कायम आमच्यासाठी मार्गदर्शक आणि आदरणीय आहे. विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या विजयात राणेसाहेबांचा मोठा वाटा होता. धडक कामगार युनियनचे सर्व सभासद दिवस-रात्र न पाहता अखंड प्रचार करत होते म्हणूनच वसईमध्ये परिवर्तन झाले आणि भाजपचा आमदार निवडून आला. त्यामुळे राणे साहेबांबरोबरचे आमचे नाते अधिकच जवळचे आहे.
उत्तम कुमार यांनी बोलताना, भाजपामध्ये दररोज बविआ सोडून माजी नगरसेवक व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने येत आहेत. त्यामुळे विरोधकांकडून जुन्या कार्यकर्त्यांचे काय? असा सवाल उपस्थित करून भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम कसा निर्माण करता येईल यासाठी मोठे प्रयत्न चालू आहेत. परंतू मी त्यांना सांगू इच्छितो की, अशा बोगस प्रचाराने आमचा कार्यकर्ता डगमगत नाही. आमच्या कार्यकर्त्यांचे आयुष्यच मुळात संघर्ष करण्यात गेलेले आहे. त्यामुळे अर्ध्या हळकुंडाणे पिवळा होणारा भाजपाचा कार्यकर्ता नाही.
कार्यक्रमावेळी सिद्धेश तावडे, बाळा सावंत, रॉकी किणी, राज वाघमारे आदींना धडक कामगार युनियनच्या पदी नियुक्ती देण्यात आली. तसेच वास्ट मीडिया नेटवर्क प्रा. लि. चे सीइओ अमोल राणे, भाजपा नवनियुक्त जिल्हा सचिव श्रीकुमारी मोहन, धडक कामगार युनियनचे पदाधिकारी बी. के. पांडे, गिरीराज शुक्ला, अभय झा, राजकुमार, रवी बनसोडे, फरीद शेख, नितीन तोरस्कर आदींचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धडक कामगार युनियनच्या आरती सावंत, बबन आगडे, सत्यविजय सावंत, प्रकाश पवार आदींनी विशेष मेहनत घेतली.





Comments