सेवा व धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज सिकाॅम कार्यालयात सिकाॅमचे संचालक कान्हुराज बगाटे (आय ए एस) यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सेवा युनियनचे पदाधिकारी रसिका स
- dhadakkamgarunion0
- Jun 17
- 1 min read
सेवा व धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज सिकाॅम कार्यालयात सिकाॅमचे संचालक कान्हुराज बगाटे (आय ए एस) यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सेवा युनियनचे पदाधिकारी रसिका सावंत (GS), स्वाती जोशी (Jt. GS), नंदा घाडीगावकर (Treasurer), स्वरदा चवरीकर, नीता राठोड, संदीप मुंडके, दादासाहेब यादव, संजय पवार आणि पंकज रहाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी धडक कामगार युनियन आणि सेवा युनियनचे अध्यक्ष अभिजीत राणे यांनी सिकाॅम कर्मचाऱ्यांचा उर्वरित ६% महागाई भत्ता दिनांक १ ऑक्टोबर २०२४ तसेच चालू महागाई भत्ता दिनांक १ एप्रिल २०२५ पासून देण्यात यावा आणि वार्षिक नियमित वेतनवाढ देण्यात यावी, अशी मागणी लेखी मागणीपत्राद्वारे सिकाॅम व्यवस्थापनाकडे केली. त्या मागणीपत्रावर बगाटे यांनी तूर्तास सही करून मान्यता दर्शवली.
तसेच, अभिजीत राणे यांनी या मागणीपत्राची एक प्रत सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकरिता मागवून त्यांना सुपूर्द करण्याचे वचन सेवा युनियनच्या सर्व सदस्यांना दिले. यावेळी सेवा युनियन आणि सर्व सिकाॅम कर्मचाऱ्यांच्यावतीने मनःपूर्वक आभार व्यक्त केले!






























Comments