• *मुंबई विमानतळावर 'धडक जनसंवाद'* • कृपाशंकर सिंग आणि कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख उपस्थितीत 4000 ओला उबेर चालकांना मोफत छत्री वाटप ------ मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प
- dhadakkamgarunion0
- Jun 16
- 1 min read
• *मुंबई विमानतळावर 'धडक जनसंवाद'*
• कृपाशंकर सिंग आणि कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख उपस्थितीत 4000 ओला उबेर चालकांना मोफत छत्री वाटप
------
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात धडक कामगार युनियन महासंघाच्या वतीने ओला-उबेर टॅक्सी चालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रविवार, १५ जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता पार पडलेल्या या विशेष कार्यक्रमात भाजपाचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंग यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी ओला-उबेर चालकांच्या समस्यांबाबत सकारात्मक संवाद साधत, त्यांच्या हितासाठी शासनदरबारी आवाज उठवण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमात बोलताना कृपाशंकर सिंग म्हणाले, "ड्रायव्हर भाऊंचे योगदान फार मोठे आहे. त्यांच्यासाठी सुरक्षित आणि सन्मानपूर्वक कामाचे वातावरण निर्माण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. सरकारपातळीवर योग्य ते पाठपुरावा केला जाईल."
या संवादात प्रमुख मार्गदर्शक म्हणून धडक कामगार युनियन महासंघाचे संस्थापक व अध्यक्ष, कामगार नेते अभिजीत राणे यांनी युनियनच्या भूमिका ठामपणे मांडल्या.
अभिजीत राणे यांनी आपल्या भाषणात सांगितले, "कामगार हा समाजाचा कणा आहे. ओला-उबेर चालकांचे प्रश्न हे केवळ वाहतूक क्षेत्रातील नाहीत, तर सामाजिक न्यायाशी निगडित आहेत. आम्ही त्यांच्या हक्कासाठी सतत रस्त्यावर राहू."
या कार्यक्रमात युनियनच्या वतीने प्रत्येक चालकाला प्रवाशांच्या सेवेसाठी 2 हजार चालकांना मोफत छत्री वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन तौफिक शेख (जम्बू ) - सचिव, इस्तेखार (मॅनेजर) – सचिव, ईमान खान (अध्यक्ष, टर्मिनल 1), जयश्री सिंग (अध्यक्ष – टी.आर.ओ.यू),, यांच्या पुढाकाराने अत्यंत यशस्वीपणे पार पडले.
त्याचबरोबर युनियनच्या इतर अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.ज्यामध्ये बबन आगडे, रवी बनसोडे, प्रकाश पवार, सत्यविजय सावंत, दीपक बाबर, रोहित गुडेकर, अभिषेक चव्हाण, आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष योगदान दिले.
#KripashankarSingh #AbhijeetRane #DhakkKamgarUnion #TaxiUnion #JanSamvad2025 #OlaUberDrivers #MumbaiAirport #KamgarNeta #WorkersRights #DriversVoice



























Comments