भाजपाची दिवाळी आशा सेविकांसोबत... --- आमदार स्नेहा दुबे पंडीत, कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख उपस्थिती ---- भाजप महाराष्ट्र प्रदेश केरळ प्रकोष्ठ आणि प्रतिक्षा फाउंडेशनच्या वतीने वसईत जिल्हा परिष
- dhadakkamgarunion0
- 3 hours ago
- 1 min read
भाजपाची दिवाळी आशा सेविकांसोबत...
---
आमदार स्नेहा दुबे पंडीत, कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख उपस्थिती
----
भाजप महाराष्ट्र प्रदेश केरळ प्रकोष्ठ आणि प्रतिक्षा फाउंडेशनच्या वतीने वसईत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा सेविकांसाठी खास ‘साडी भेट कार्यक्रम’ व पत्रकार बांधवांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महिलांच्या योगदानाचा सन्मान करत समाजात सकारात्मक ऊर्जेचा संदेश देणारा हा उपक्रम दिवाळीच्या मंगलक्षणी पार पडला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार स्नेहा दुबे पंडीत व धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रतिक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष उत्तम कुमार यांनी केले होते. तसेच विशेष अतिथी म्हणून माजी नगरसेवक प्रदीप पवार, शेखर धुरी, विजेंद्र कुमार, नंदकिशोर पवार, छोटू आनंद, प्रकाश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वसई तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला.
“आपल्या समाजाच्या आरोग्यसेवेत दिवस-रात्र झटणाऱ्या आशा सेविकांचा सन्मान हीच खरी दिवाळीची पहाट आहे. पत्रकार समाजाला आरसा दाखवतो, आम्हाला आरसा दाखवण्याचे काम करतो, म्हणून तो देशाचा चौथास्तंभ आहे. असे स्नेहा दुबे पंडीत, यावेळी म्हणाल्या.
“कामगार, आशा सेविका आणि समाजघटक यांचा सन्मान करणे हेच धडक कामगार युनियनचे ध्येय आहे. समाजासाठी काम करणाऱ्यांच्या पाठीशी धडक कामगार युनियन सोबत आहे. आम्ही नेहमी आहोत.” असे अभिजीत राणे म्हणाले.
“सामाजिक बांधिलकी जपत ‘प्रतिक्षा फाउंडेशन’तर्फे प्रत्येक घटकापर्यंत आनंद पोहोचवणे, ही आमची दिवाळी साजरी करण्याची खरी पद्धत आहे.” अशी प्रतिक्रिया उत्तम कुमार यांनी दिली.




Comments