◆ *बेकायदेशिरपणे काढलेल्या वनमजुरांना तात्काळ सेवेत घेतले जाणार: अभिजीत राणे* ------- ◆ अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांच्या सोबत झालेल्या बैठकीत निर्णय ◆ धडक च्या १२ नोव्हेंबरच्या आंद
- dhadakkamgarunion0
- Nov 18, 2025
- 1 min read
◆ *बेकायदेशिरपणे काढलेल्या वनमजुरांना तात्काळ सेवेत घेतले जाणार: अभिजीत राणे*
-------
◆ अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांच्या सोबत झालेल्या बैठकीत निर्णय
◆ धडक च्या १२ नोव्हेंबरच्या आंदोलनास यश
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या दालनात आज 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या आंदोलना संदर्भात अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांची धडक कामगार युनियनच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे, धडक वनविभाग चे अध्यक्ष जॉनी वायके, रमेश धुरी, भगवान तांदळकर आदी उपस्थित होते. तर प्र्रशासनाकडुन डिएफओ किरण पाटील व एसीएफ सुधीर सोनावले उपस्थित होते. यावेळी प्रलंभित सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये मुख्यत्वे बेकायदेशिरपणे कामावरुन कमी केलेल्या वनमजुरांना तात्काळ सेवेत घेण्याचे आदेश रामगावकर यांनी दिले. तसेच डिएफओ किरण पाटील, एसीएफ सुधीर सोनावले, डॉक्टर , गार्ड संदर्भात चौकशी करण्यात येईल असे सांगण्यात आले. याशिवाय मागील अनेक वर्षांपासून प्र्रलंबित असलेले गणवेश, बुट, काठी, टॉर्च याबाबतीत तात्काळ निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले. याशिवाय वनमजुरांचे दरमहिना उशिरा होणारे पगार यासंदर्भात ही निर्णय घेण्यात आला.
कामगार नेते अभिजीत राणे यांनी डिएफओ किरण पाटील, एसीएफ सुधीर सोनावले व डॉक्टर यांच्या विरोधात असणाऱ्या तक्रारी तर गार्डच्या मागील 10 ते 15 वर्षांपासून न झालेल्या बदल्यांसंदर्भात चौकशी करण्याची मागणी केली आहे. बैठक अंती कामगार नेते अभिजीत राणे यांनी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांचा शाल घालून सत्कार केला.








Comments