🇮🇳 *पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची ‘मन की बात’ एक संदेश!* ===== धडक कामगार युनियन महासंघ कार्यालय, गोरेगाव (प.) येथे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
- dhadakkamgarunion0
- Jul 29
- 1 min read
🇮🇳 *पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची ‘मन की बात’ एक संदेश!*
=====
धडक कामगार युनियन महासंघ कार्यालय, गोरेगाव (प.) येथे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. भाजपा मुंबईचे उपाध्यक्ष व कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
अभिजीत राणे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, ‘मन की बात’ कार्यक्रमातून नरेंद्रजी मोदी प्रत्येक नागरिकाशी थेट संवाद साधतात. आजच्या या कार्यक्रमाने आपण सर्वांनी देशहिताच्या कामात अधिक जोमाने सहभागी व्हावे, अशी प्रेरणा मिळाली.” कार्यक्रमाचे आयोजन महेंद्र झगडे, अध्यक्ष – आरे मंडळ यांनी केले होते. सर्व उपस्थितांना मोदींच्या विचारांची प्रेरणा घेऊन कार्य करण्याचा संकल्प या प्रसंगी करण्यात आला.
#मनकीबात #NarendraModi #AbhijeetRane #BJP #गोरेगाव #धडककामगारयुनियन #प्रेरणास्त्रोत



Comments