धडक हॉस्पिटल अँब्युलन्स युनिट आणि धडक कामगार युनियन महासंघाच्या माध्यमातून, मालाड पश्चिम येथे मोफत शालेय बॅग व छत्री वाटपाचा कार्यक्रम मंगळवार दिनांक ८ जुलै २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमात
- dhadakkamgarunion0
- Jul 11
- 1 min read
धडक हॉस्पिटल अँब्युलन्स युनिट आणि धडक कामगार युनियन महासंघाच्या माध्यमातून, मालाड पश्चिम येथे मोफत शालेय बॅग व छत्री वाटपाचा कार्यक्रम मंगळवार दिनांक ८ जुलै २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमात युनियनच्या कार्यकर्त्यांच्या मुला-मुलींना आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून धडक कामगार युनियन महासंघचे संस्थापक व अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे व माजी नगरसेवक दीपक ठाकूर यांची उपस्थिती लाभली. अभिजीत राणे यांनी यावेळी बोलताना, “कामगार वर्ग आणि त्यांच्या कुटुंबातील मुलांना आधार देणे, त्यांच्या शिक्षणासाठी गरज भासणारे साहित्य उपलब्ध करून देणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. केवळ मागण्या करण्यापुरते संघटन मर्यादित नसावे, तर समाजातील गरजूंना मदतीचा हात देणे हे आमचे कर्तव्य मानतो. धडक कामगार युनियन महासंघ यापुढेही असे उपक्रम सातत्याने राबवत राहील.”
दीपक ठाकूर यांनी यावेळी बोलताना, समाजातील प्रत्येक मुलाला शिक्षणाची समान संधी मिळावी, यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. कामगारांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी मदत करण्याचा हा प्रयत्न खरोखरच प्रेरणादायी आहे. पुढेही अशा विधायक कार्यात माझा सक्रिय सहभाग राहील. असे यावेळी ते म्हणाले.
या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.





Comments