*'धडक' व 'मैत्री'चे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न!* मुंबई : धडक कामगार युनियन महासंघ व मैत्री संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कामगार, समाजसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसाठी स्नेहसंमेलनाचे भव्य आ
- dhadakkamgarunion0
- Jul 15
- 2 min read
*'धडक' व 'मैत्री'चे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न!*
मुंबई : धडक कामगार युनियन महासंघ व मैत्री संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कामगार, समाजसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसाठी स्नेहसंमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले. रविवार, दि. १३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता धडक कामगार युनियन महासंघाच्या कार्यालयात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
धडक कामगार युनियन महासंघ गेल्या अनेक वर्षांपासून कामगार कल्याण, गरजू कुटुंबांना मदत, मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, छत्री-वस्त्र वाटप, महिला सक्षमीकरण कार्यशाळा आणि तळागाळातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप अशा सामाजिक उपक्रमांमुळे परिचित आहे. या कार्यात नेहमीच पुढाकार घेणारे विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांचे मार्गदर्शन लाभत असते.
स्नेहसंमेलनात प्रमुख उपस्थितीत अभिजीत राणे तर विशेष अतिथी म्हणून आरोग्यमित्र मा. सुभाषराव गायकवाड, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डॉ. संतोष कांबळे, ज्येष्ठ समाजसेवक गौतम सोनी , राष्ट्रीय बहुजन विकास संघटनेचे अध्यक्ष शरद अण्णा तिघोटे, मुक्त पत्रकार व वनिता फाउंडेशनचे प्रभाकर कांबळे, तसेच महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे मुंबई जिल्हाध्यक्ष व राष्ट्रीय कोषाध्यक्ष संतोष खरटमोल आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात अभिजीत राणे यांना छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन करण्यात आली यावेळी "शोधिसी मानवा" हे गाणे सुरज भोईर यांनी सादर केले.
या प्रसंगी नुकताच महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब समाजभूषण पुरस्कार प्राप्त झालेले सुभाष गायकवाड यांचा अभिजीत राणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आले. महाराष्ट्रातील तळागाळातील योगशिक्षकांच्या समस्या आणि मागण्या मांडणारे निवेदन अभिजीत राणे यावेळी योग संस्थेने सुपूर्त केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अभिजीत राणे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, धडक कामगार युनियन हे केवळ श्रमिक संघटनाच नाही, तर समाजातील सर्वसामान्यांचे बळ वाढवणारे व्यासपीठ आहे. मोफत छत्री वाटप असो, आरोग्य सेवा असो किंवा शिक्षण साहित्य वाटप – आम्ही कायम गरजूंना मदतीचा हात देतो. आजच्या या स्नेहसंमेलनातून एकजुटीचा संदेश गेला आहे. पुढील काळातही कामगारांच्या व समाजातील दुर्बल घटकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असे यावेळी ते म्हणाले.
कार्यक्रमाला मैत्री संस्थेचे कार्यकर्ते विजय केदासे, मनीषा मांढरे, संतोष खरटमोल, तसेच महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे रिद्धी देवघरकर, रेश्मा धुरी पाटील, केशर कुलाबकर, अमोल देवघरकर, अमित चिबडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या स्नेहसंमेलनात राज्यभरातून आलेल्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना मोफत छत्र्या वाटप करण्यात आल्या. सर्व उपस्थितांनी चहा, अल्पोपहाराचा आस्वाद घेत कामगार नेत्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल आयोजकांकडून उपस्थितांकडून युनियन कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
#धडककामगारयुनियन #अभिजीतराणे #सामाजिककार्य #स्नेहसंमेलन #कामगारहित #मैत्रीसंस्था #छत्रीवाटप #समाजभूषणपुरस्कार #महाराष्ट्र #DhadakKamgarUnion #AbhijeetRane #WorkersUnity #UmbrellaDistribution




Comments