*धडक च्या " स्थानीय पत्रकारांचा सन्मान आणि स्नेहसंवाद; चहा वर चर्चा" उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद* मुंबई :धडक कामगार युनियन महासंघ यांच्या वतीने आयोजित "चहा वर चर्चा" स्नेहसंमेलन व मोफत छत्री वाटप क
- dhadakkamgarunion0
- Jul 15
- 1 min read
*धडक च्या " स्थानीय पत्रकारांचा सन्मान आणि स्नेहसंवाद; चहा वर चर्चा" उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद*
मुंबई :धडक कामगार युनियन महासंघ यांच्या वतीने आयोजित "चहा वर चर्चा" स्नेहसंमेलन व मोफत छत्री वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. स्थानिक पत्रकार बांधव व भगिनींना एकत्र आणून स्नेहसंवाद साधण्यासाठी हा आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला होता.
कार्यक्रमाला पत्रकारांनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार बांधव व भगिनींना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले. उपस्थितांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले.
धडक कामगार युनियन महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष व कामगार नेते अभिजीत राणे यांनी या प्रसंगी बोलताना,
"पत्रकार बांधव हे समाजाचा आरसा असतात. त्यांची खरी ओळख ही त्यांच्यातील सचोटी, संघर्षशील वृत्ती आणि जनतेशी असलेली बांधिलकी यातून दिसून येते. आपले कष्ट काहीसा सन्मानित करण्यासाठी व थोडासा आधार देण्यासाठी आजचा हा स्नेहसंमेलन व मोफत छत्री वाटप उपक्रम आम्ही आयोजित केला आहे. पत्रकारांनी नेहमीच कामगार चळवळीला आवाज दिला, आमच्या प्रश्नांना समाजासमोर मांडले, त्यामुळे त्यांच्या ऋणात आम्ही आहोत. यापुढेही असे उपक्रम सातत्याने राबवणार आहोत."
या कार्यक्रमाचे आयोजन गोरेगाव येथील धडक कामगार युनियन महासंघाच्या कार्यालयात करण्यात आले होते.
कार्यक्रमात पत्रकार बांधवांनी आपल्या मनोगतातून आपल्या अडचणी, कामाचा ताण तसेच समाजाशी असलेली नाळ यावर मोकळेपणाने चर्चा केली. उपस्थितांनी अभिजीत राणे यांच्या उपक्रमशीलतेचे व सामाजिक भानाचे कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धडक कामगार युनियन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी व स्वयंसेवकांनी मेहनत घेतली.
-----




Comments