*धडक कामगार युनियनतर्फे ठाणे परिवहनच्या चालकांच्या मुला मुलींना मोफत शालेय बॅग आणि छत्री वाटप* ===== धडक कामगार युनियनच्या वतीने ठाणे परिवहनच्या चालकांच्या मुला मुलींना मोफत शालेय बॅग आणि छत्री वाटप र
- dhadakkamgarunion0
- Jul 11
- 2 min read
*धडक कामगार युनियनतर्फे ठाणे परिवहनच्या चालकांच्या मुला मुलींना मोफत शालेय बॅग आणि छत्री वाटप*
=====
धडक कामगार युनियनच्या वतीने ठाणे परिवहनच्या चालकांच्या मुला मुलींना मोफत शालेय बॅग आणि छत्री वाटप राबवण्यात आले. मे. सिटी लाईफ लाईन ट्रॅव्हल्स प्रा. लि. युनिट (ठाणे परिवहन) युनिटच्या सर्व चालकांच्या मुला-मुलींना मोफत शालेय बॅग आणि छत्री वाटप करण्यात आले.
या वेळी धडक कामगार युनियनचे संस्थापक व महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, धडक कामगार युनियन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राज्यात कार्यरत असून, ठाणे परिवहनमधील बस चालक आणि कामगार हे दिवस-रात्र मेहनत करूनही कंपनी प्रशासनाकडून केवळ अन्यायाचं आणि शोषणाचं बळी ठरत आहेत. जाणून-बुजून पगार कपात करणे, आणि त्यावर प्रश्न विचारला तर त्या कामगाराला दडपशाहीच्या माध्यमातून गप्प बसवले जाते. इतकेच नव्हे, सुट्ट्यांची कायदेशीर मागणी केली तरी त्यांना खोटे कारणे दाखवून कामावरून कमी करण्याची भीती दाखवली जाते. यापेक्षाही दुर्दैवी बाब म्हणजे बसमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असताना, चालकाने वेळेवर तक्रार करूनही, देखभाल न करता उलट या दोषाची जबाबदारी चालकावरच टाकली जाते. त्यामुळे एका बाजूला जीव धोक्यात घालून बसेस चालवाव्या लागतात आणि दुसऱ्या बाजूला अपघात झाला तर सर्व दोष चालकावर फोडला जातो. कंत्राटी चालकांचा हा अपमान आणि अन्याय थांबला पाहिजे. बसची देखभाल ही कंपनीची जबाबदारी आहे, ती चालकावर ढकलणे ही खोड कधीपर्यंत चालणार? असा सवाल यावेळी त्यांनी व्यक्त केला. जर या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले गेले, तर कामगारांना सोबत घेऊन मोठ्या आंदोलनाची भूमिका घेण्यास आम्ही तयार आहोत. आमच्या कामगारांचा सन्मान आणि हक्क मिळवण्यासाठी लढा सुरूच राहील.”
कार्यक्रमात युनियनचे अनेक पदाधिकारी तानाजी कळंबे (युनिट अध्यक्ष), सचिन निगळ (पाटील) (कार्याध्यक्ष), समाधान जाधव (उपाध्यक्ष), प्रभाकर निलंगे (सचिव), दिगंबर माळी (उपाध्यक्ष), सुधीर सानप (उप-महासचिव), राजू चव्हाण (चिटणीस) तसेच सदस्य म्हणून योगेश पवार, मनोज वाघमारे, विनोद कुंभार, साईनाथ कोरडे, रूपेश शिंपी, गणेश पाटील, चेतन थाग, रवी पाटील यांची उपस्थिती लाभली.
#धडककामगारयुनियन #अभिजीतराणे #सामाजिकउपक्रम #मोफतवाटप #कामगारहित #abhijeetrane #photo #Thane #parivahan #Thaneparivahan






























Comments