धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व ‘सेवा’चे अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज सिकाॅम कार्यालयाला भेट देऊन सिकाॅमचे नवनिर्वाचित संचालक विवेक भिमनवार यांची सदिच्छा भेट घेतली. व त्यांचे मनःपूर
- dhadakkamgarunion0
- Jul 1
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व ‘सेवा’चे अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज सिकाॅम कार्यालयाला भेट देऊन सिकाॅमचे नवनिर्वाचित संचालक विवेक भिमनवार यांची सदिच्छा भेट घेतली. व त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले आणि सिकाॅमचे प्रशासन यशस्वीपणे व कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी शुभेच्छा दिल्या. अभिजीत राणे व विवेक भिमनवार यांचे अतिशय जवळचे मैत्रीपुर्ण संबंध असून यापुर्वी त्यांच्याकडे राज्याची परिवह आयुक्त पदाची जबाबदारी होती त्यावेळी त्यांनी रिक्षा चालकांसाठी अनेक महत्तवाचे निर्णय घेतले होते.
यावेळी सेवा युनियनचे पदाधिकारी – पंकज रहाटे (महासचिव), रसिका सावंत (माजी महासचिव), स्वाती जोशी (सह-महासचिव), दादासाहेब यादव (सह-महासचिव), संदीप मुंडके (कोषाध्यक्ष), नंदा घाडीगावकर (सह-कोषाध्यक्ष), मनीष जग्गी, नीता राठोड, संतोष चव्हाण आणि सतीश मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अभिजीत राणे यांनी सेवा युनियनच्या वतीने मागील काही काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांची पूर्तता नवनिर्वाचित संचालकांकडून लवकरच करण्यात येईल, अशी खात्री यावेळी उपस्थित सर्व सदस्यांना दिली. अभिजित राणे यांचे, सेवा युनियन आणि सर्व सिकाॅम कर्मचाऱ्यांच्यावतीने मनःपूर्वक आभार यावेळी व्यक्त करण्यात आले.
#abhijeetrane #sicom #meeting #विवेकभीमनवार #photo















Comments