धडक कामगार युनियन महासंघाच्या धडक हॉकर्स व फेरीवाला युनियन च्या वतीने कांदिवली चारकोप मार्केट येथे फेरीवाल्यांसाठी विशेष जनसंवाद व मोफत छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात स्थानिक फ
- dhadakkamgarunion0
- Jul 28
- 1 min read
धडक कामगार युनियन महासंघाच्या धडक हॉकर्स व फेरीवाला युनियन च्या वतीने कांदिवली चारकोप मार्केट येथे फेरीवाल्यांसाठी विशेष जनसंवाद व मोफत छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात स्थानिक फेरीवाल्यांशी थेट संवाद साधण्यात आला व त्यांच्यावर येणाऱ्या नैसर्गिक संकटांपासून त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी छत्र्या वाटप करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक, धडक कामगार युनियन महासंघाचे संस्थापक आणि महासचिव अभिजीत राणे यांनी सांगितले, "फेरीवाले हे शहराच्या आर्थिक प्रवाहाचे अविभाज्य घटक आहेत. त्यांचे सन्मानाने जीवन जगण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्यासोबत आहोत." या कार्यक्रमाचे आयोजन अभिजीत भोईटे, राजू भूमिक आणि जितेश शिंदे यांनी केले.




Comments