धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक-मालक युनियनच्या श्रीकृष्णा नगर, पूजा कमिटी, रिक्षा स्टॅन्ड, गणेश मंदिर रोड, संतोष नगर, गोरेगाव (पू.) च्या शेकडो रिक्षा चालकांनी "धडक"चे प्रतिनिधित्व स्वीकारले असून आज 15 ऑगस
- dhadakkamgarunion0
- Aug 15
- 1 min read
धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक-मालक युनियनच्या श्रीकृष्णा नगर, पूजा कमिटी, रिक्षा स्टॅन्ड, गणेश मंदिर रोड, संतोष नगर, गोरेगाव (पू.) च्या शेकडो रिक्षा चालकांनी "धडक"चे प्रतिनिधित्व स्वीकारले असून आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून फलक उदघाट्न व ध्वजरोहण कार्यक्रमाचे आयोजन कमिटी कडून करण्यात आले होते. यास कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून रिक्षा चालकांना संबोधित केले. स्टॅन्ड चे अध्यक्ष सुनील गुजर, उपाध्यक्ष श्रीराम सिंह, सचिव चरणसिंह यादव, सहाय्यक सचिव रामकरण यादव, कोशाध्यक्ष सुभाषचंद्र यादव, उपकोशाध्यक्ष महादेव मेंगे, कमिटी सदस्य कमलेश सिंह, जयशंकर यादव, सुरेंद्र यादव, सुखाराम यादव, रामबाबू पटेल आदी सभासद व शेकडो रिक्षाचालक उपस्थित होते.
अभिजीत राणे यांनी यावेळी बोलताना, धडक कामगार युनियन महासंघ ही युनियन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात काम करते. आपल्याला असणाऱ्या सगळ्या समस्या आजपासून युनियनच्या समस्या झाल्याअसून आपल्या एकीने वाढलेली ताकदच आपल्याला भविष्यात मोठे यश प्राप्त करून देईल. असे यावेळी ते म्हणाले.



Comments