*जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखक कवी महासंघ व साप्ताहिक झुंजार लेखणीच्या वतीने महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या गौरवशाली 300 व्या जयंतीनिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघात त्यांच्या गौरव
- dhadakkamgarunion0
- Aug 20
- 1 min read
*जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखक कवी महासंघ व साप्ताहिक झुंजार लेखणीच्या वतीने महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या गौरवशाली 300 व्या जयंतीनिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघात त्यांच्या गौरव गाथे निमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 50 गुणवंतांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी आमदार अशोक भाऊ धात्रक, कामगार नेते मुंबई मित्र संपादक अभिजीत राणे ,होळकर घराण्याच्या सुनबाई तसेच शासनाचे आदिवासी प्रकल्प अधिकारी तेजस्वी गलांडे होळकर ,प्रसिद्ध सौंदर्यतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या स्वाती ओक मॅडम , पोलीस मित्र व समाजभूषण दिलीप नारद,तेजस्विनी महिला संस्थेच्या अध्यक्षा संगीताताई शिंदे अभिनेत्री जारा खान ,शिवश्री विजय भोसले व फिल्म संसार बोर्ड सदस्य विलास खानोलकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला, यावेळी , धडक कामगार युनियन महासंघाचे महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यांनी या कार्यक्रमासाठी व महाराष्ट्रातून आलेल्या सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि मी नेहमीच आपल्या सोबत असेल असा आश्वासन अभिजीत राणे यांनी प्रसंगी दिले, याच् आयोजन सामाजिक कार्यकर्ते मुक्त पत्रकार सुरज भोईर व झुंजार लेखणीचे संपादक संतोष धुरंदर यांनी केले यांनी केले होते, महाराष्ट्रभरातून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अहिल्याबाईचा विचार व कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी या कार्यक्रमातून सर्वांना प्रेरणा मिळाली*






















Comments