● *कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला हमाल बांधवांसाठी धडक कामगार युनियनतर्फे बोरिवली स्थानकातील हमाल व्हीलचेअर वाटप उपक्रम* ● विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला कार्यक्रम
- dhadakkamgarunion0
- May 9
- 1 min read
● *कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला हमाल बांधवांसाठी धडक कामगार युनियनतर्फे बोरिवली स्थानकातील हमाल व्हीलचेअर वाटप उपक्रम*
● विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला कार्यक्रम
-----
कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत, धडक कामगार युनियन महासंघतर्फे विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बोरिवली रेल्वे स्थानकावरील हमाल बांधवांना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत विशेष अतिथी म्हणून धडक कामगार युनियनचे सल्लागार गणपत कोठारी उपस्थित होते.
कामगार नेते अभिजीत राणे यांनी याबाबतीत बोलताना, या उपक्रमामागचा उद्देश हमालांची कार्यसुविधा वाढवणे तसेच गरजूंना सहकार्य करणे हा आहे. धडक कामगार युनियनचे राज्यात १८०० पेक्षा अधिक युनिट असून, दरवर्षी कामगार दिनाचे औचित्य साधून युनियनच्या माध्यमातून लोकउपयोगी कार्यक्रम घेत असतो. यावेळी अनेक हमालांनी आपली प्रतिक्रिया देताना कृतज्ञता व्यक्त केली. कामगार दिनाच्या औचित्याने करण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक सलोखा व सहकार्याचे सुंदर उदाहरण ठरला.
यावेळी धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे पदाधिकारी अमजद पठाण, तुकाराम नाईक, विष्णू परब, विनोद मोरे, चंद्रकांत राऊत, प्रविण मोहिते, समाधान गायकवाड, उमेश सावंत, विलास पाटील, माऊली, आत्माराम झगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
#कामगारदिन #सामाजिकबांधिलकी #हमालबंधू #व्हीलचेअरवाटप #UnionInitiative #BorivaliStation #SupportForWorkers #RespectForLabour























Comments