अभिजीत राणे लिहितात, पंढरीच्या वारीच्या पार्श्वभूमीवर एक सुंदर दृश्य बघायला मिळाले. आळंदीच्या इंद्रायणी नदीच्या काठावर एक आजी शांतपणे बसलेल्या होत्या. त्या क्षणांच्या चित्र त्यांच्या आठवणीत साठवून
- dhadakkamgarunion0
- Jun 23
- 1 min read
अभिजीत राणे लिहितात,
पंढरीच्या वारीच्या पार्श्वभूमीवर एक सुंदर दृश्य बघायला मिळाले. आळंदीच्या इंद्रायणी नदीच्या काठावर एक आजी शांतपणे बसलेल्या होत्या. त्या क्षणांच्या चित्र त्यांच्या आठवणीत साठवून ठेवायचं होतं. त्यांनी आजूबाजूला पाहिलं आणि जवळच उभ्या असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्यांना विनंती केली —“एक फोटो काढाल का?”ते अधिकारी काही साधे पोलीस नव्हते, तर थेट तीन स्टार असलेले सहा. पोलीस निरीक्षक होते. पण त्यांनी क्षणाचाही विलंब न करता, कोणताही अभिमान न बाळगता, मनापासून त्या आजींचा मोबाईल घेतला आणि फोटो काढला.फोटो घेतल्यावर त्यांनी प्रेमाने सांगितलं,“आज्जी, उभ्या राहा, फोटो अजून छान येईल!”ते ऐकताच आज्जीही आनंदाने उठल्या आणि हसऱ्या चेहऱ्याने फोटोसाठी उभ्या राहिल्या. महाराष्ट्र पोलीस हे केवळ २४ तास कर्तव्य बजावत नाहीत, तर सामान्य माणसाच्या भावना समजून घेणारा आणि त्यांना मान देणारा संवेदनशील माणूसही असतो.






Comments