ग्रेट भेट
महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन तसेच दुग्धव्यवसाय विकास व क्रीडा व युवक कल्याण मंत्री सन्मा. सुनील केदार यांनी आरे रुग्णालयास भेट दिली, यावेळी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आरे दुग्धशाळेच्या कामगार वर्गानी धडक कामगार युनियनचे प्रतिनिधित्व स्वीकारलेले आहे त्या पार्श्वभूमीवर अभिजीत राणे व मंत्री महोदय यांच्यामध्ये कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. यावेळी मंत्री महोदयांनी गोरेगाव येथील धडक कामगार युनियनच्या मुख्य कार्यालयासही सदिच्छा भेट दिली.
Comments