१ मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधत धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, विख्यात कामगार नेते श्री. अभिजित राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. गोरेगाव पूर्व स्थित धडक कामगार भवन येथील मुख्यालयात आयोजित भव्य मेळाव्याला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार श्री. गजानन कीर्तिकर यांची विशेष उपस्थिती लाभली. धडक कामगार भवनात आल्यावर श्री सत्यनारायण पूजेचा आशीर्वाद घेतल्यावर श्री. अभिजीत राणे यांनी श्री. गजानन कीर्तिकर यांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या मेळाव्यादरमन श्री. कीर्तिकर यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांचे कामगारविषयक वाटचालीचे कौतुक करीत भरघोस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रसिद्ध संगीतकार श्री. दिलीप सेन यांच्यासह धडक कामगार युनियनचा कर्मचारी वर्ग, पदाधिकारी आणि विविध युनियनमधील कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.















































Comments