top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane with Jeevandhara Sangh for opening Aarey Hospital for 24 Hours

आरे दुग्ध वसाहती मधील आरे रुग्णालय स्थानिकांसाठी २४ तास सुरु राहावे यासाठी जीवनधारा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पांडे आणि महाराष्ट्र महिला अध्यक्ष सारिका नायडू यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक ११ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण करण्यात आले आहे. या उपोषणस्थळी विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला. आरे रुग्णालय स्थानिक जनतेच्या सेवेसाठी 24 तास चालू ठेवावे तसेच चांगल्यात चांगले डॉकटर नियुक्त करावेत तसेच येथे अद्ययावत मशीन रक्त पेढी, पॅथॉलॉजी, एक्सरे मशीन, ऑपरेशन थिएटर, सोनोग्राफी मशीन आणाव्यात या मागण्या असून अभिजीत राणे यांच्या अभिजीत राणे युथ फाऊंडेशनद्वाराही आपले समर्थन दर्शवण्यात आले आहे.

16 views0 comments

Comentários


bottom of page