विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक कामगार युनियन) यांनी गौतम नगर, फिल्टर पाडा, आरे मिल्क काॅलनी येथे आयोजित आमचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन केले व उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिले. या सोहळयात विभागातील महिलांसाठी हळदी कुंकु व मुलांसाठी बाॅक्स क्रिकेट टुर्नामेंट आयोजित करण्यात आली. पवई पोलिस ठाण्याचे पूर्व वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर कांबळे यांच्या हस्ते अभिजीत राणे यांच्या सत्कार करण्यात आला. धडक कामगार युनियनतर्फे क्रिकेट टुर्नामेंटमधील विजेता टीमला प्रथम पारितोषिक व द्वितीय पारितोषिक बक्षीस देण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे वार्ड क्र.121 चे वार्ड उपाध्यक्ष श्री रोशन पुजारी व कार्यकत्र्यांतर्फे करण्यात आला. या कार्यक्रमात धडक कामगार युनियनचे उपाध्यक्ष अॅड. नारायण पणीकर व सायरा खान ( मुंबई उपाध्यक्ष -धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


















Comments