बोरीवली रिक्शा चालक मालक पूजा समिती व धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्या सभासदांच्या माध्यमातुन सोमवार दि. 1 जानेवारी, 2024 रोजी बोरीवली स्टेशन जवळ, रेल्वे रिक्शा स्टॅण्ड, दक्षिण ब्रिज, बोरीवली (पूर्व), मुंबई येथे श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली. यावेळी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांनी उपस्थित राहुन दर्शन घेतले तसेच सर्व रिक्शा चालक मालकांना नववर्षानिमित्त शुभेच्छा दिले . कार्यक्रमात कस्तुरबा मार्ग पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल आव्हाड उपस्थित होते त्यांनी रिक्शा चालकांचे मार्गदर्शन केले. बोरीवली रिक्शा चालक मालक समिती अध्यक्ष सदानंद पाटील, सचिव तुकाराम नाईक, खजिनदार विष्णु परब यांनी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल आव्हाड यांच्या शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
top of page
bottom of page
Comments