top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane the Chief Guest at the concert organized at Vikhroli

dkusocial

सुरसम्राट किशोरदांना संदेश उमपांची विशेष आदरांजली

स्वतःच्या वाढदिवशी संदेशजींकडून सदाबहार गाण्यांची मैफल

उमप कुटुंबियांच्या वतीने विख्यात कामगार नेते अभिजीत राणेंचा खास सत्कार

वेळोवेळी मदतीसाठी तत्पर असलेल्या अभिजीत राणेंचे संदेश उमप यांच्याकडून आभार

ऋणानुबंध जपण्याचे अभिजीत राणेंकडून आश्वासन

मुंबई

आपल्या अलोकिकीं सदाबहार आवाजाने आजच्या तरुण पिढीला मोहिनी घालणार सुरसम्राट, हिंदी चित्रपटसृष्टीला अभिनयाने खिळवून ठेवणारे अभिनय सम्राट किशोर कुमार अर्थात सर्वांचे लाडके किशोरदा यांचा जन्मदिन ४ ऑगस्ट रोजी येतो....योगायोग असा की दिवंगत लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे चिरंजीव आणि गायक-निर्माता संदेश उमप यांचाही वाढदिवस ४ ऑगस्ट रोजी येतो. विशेष म्हणजे संदेश उमप हे किशोरदा यांचे खूप मोठे चाहते आहेत आणि म्हणूनच आपल्या वाढदिवशी संदेश उमप यांनी सुरांच्या या बादशहाने स्वरबद्ध केलेल्या गीतांना 'आगर तुम ना होते...' या संगीतराजनीद्वारे उजाळा देत अनोखी मानवंदना देण्याचा प्रयत्न केला.

प्रसिद्ध हिंदी गायक आणि अभिनेते किशोर कुमार यांना त्यांच्या जन्मदिनी एक सलाम देण्याच्या उद्देशाने लोकशाहीर विठ्ठल उमप कला विकास मंडळाच्या वतीने आगर तुम ना होते....या संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, दैनिक मुंबई मित्र-वृत्त मित्रचे समुह संपादक अभिजीत राणे साहेब हे प्रामुख्याने आवर्जून उपस्थित होते. अभिजीत राणे हे कलावंतांच्या पाठीशी नेहमीच असतात तर गोरगरिबांसाठीही ते सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असतात. विशेष म्हणजे आमच्या उमप कुटुंबियांसाठी ते सदैव मदतीसाठी तत्पर असतात अशा शब्दात गौरवोद्गार काढीत कार्यक्रमाचे आयोजक, गायक संदेश उमप यांनी अभिजीत राणे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुछ देऊन विशेष सत्कार केला. तर अभिजीत राणे यांनीही संदेश उमप याना त्यांच्या जमदिनानिमित्त शुभेच्छा देत उमप कुटुंबियांबरोबर ऋणानुबंध कायम राहतील असे वचन दिले.

प्रसिद्ध हिंदी गायक किशोर कुमार आणि गायक-निर्माता संदेश उमप यांचा वाढदिवस ४ ऑगस्ट रोजी येतो. आज किशोरदा आपल्यात हयात नाहीत. पण त्यांच्या गाण्यांनी आजही तरुणाईला वेड लावले आहे आणि म्हणूनच संदेश उमप यांच्या संकल्पनेतून त्यांना मानवंदना अर्थात ट्रीबुट देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या खास दिनी विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांना त्यांच्या गोरेगाव पूर्वस्थित युनियनच्या मुख्यालयात संदेश उमप यांनी सपत्नीक जाऊन विशेष निमंत्रण दिले आणि अभिजीत राणे यांनीही संदेश उमप यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी उपस्थिती दर्शवली. बुधवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी विक्रोळी कन्नमवार नगर २ मध्ये सायंकाळी विशेष संगीतरजनीचे आयोजन करण्यात आले. किरशोरदांच्या आवाजातील गाण्यांना गायक संदेश उमप यांनी आपल्या आवाजात सादर करून कार्यक्रमात बाहेर आणली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिडको एक्झचुटीव्ह इंजिनीअर शिलरत्न जगतापसाहेब, साहित्यिक संजय सावंत साहेब, समाजसेवक आणि पत्रकार सुमेध जाधव, समाजसेवक सिद्धार्थ चंदनशिवे, ऍड व्हिजनचे विनोदजी कांबळे, समाजसेवक भगवान साळवी साहेब, रवींद्र लगाडे साहेब,

मराठी अभिनेते रमेश वाणी , राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट कला साहित्य जिल्हा संघटक आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ऐरोली शाखा कमिटी सदस्य अजयजी , फोटोग्राफर प्रीतम शेलर, गायिका रागिणी मुंबईकर, पत्रकार राकेश शिर्के, समाजसेवक आत्माराम वाघमारे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
















 
 
 

Recent Posts

See All

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page