top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane thanked Transport Minister of Maharashtra Adv. Anil Parab

कामगार नेते अभिजीत राणेंकडून परिवहन मंत्र्यांचे आभार

धडक ऑटो-रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या रिक्षा भाडेवाढीचा पाठपुराव्याला मिळाले यश

मुंबई

राज्य सरकारने मुंबई एमएमआर रिजनमधील ऑटो रिक्षाचे भाडे १८ वरून २१ रुपयांवर, तर टॅक्सीचे भाडे २२ रुपयांवरून २५ रुपयांपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. १ मार्चपासून या भाडेवाढीच्या अंमलबजावणीला सुरूवात होईल, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या या निर्णयाबाबत धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी धडक ऑटो-रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या वतीने आभार मानले आहेत.

पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढत आहेत, सीएनजीच्या किमतीतही वाढ करण्यात आली मात्र गेल्या ५ वर्षात ऑटो-रिक्षा, टॅक्सीच्या भाडेवाढीचा निर्णय जैसे थेच राहिला, धडक कामगार युनियनचे संस्थपाक महासचिव, विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी सातत्याने याबाबत पाठपुरावा केला. यासंदर्भात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन धडक ऑटो-रिक्षा टॅक्सीच्या वतीने भाडेवाढ करण्यासंदर्भात प्रस्ताव ठेवला, चर्चा केली होती. अभिजीत राणे यांच्या बरोबर यासंदर्भात झालेल्या भेटीत परिवहन मंत्र्यांकडून सकारात्मकता दर्शवण्यात आली होती. अखेर काल सोमवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी ऑटो-टॅक्सीच्या भाडेवाढीचा निर्णय जाहीर केला. परिवहन मंत्र्यांकडून देण्यात आलेल्या या निर्णयामुळे धडकचे सदस्यत्व घेतलेल्या ऑटो-रिक्षा, टॅक्सीचालकांमध्ये समाधान पसरले आहे. अभिजीत राणे यांच्याकडून सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटेनच्यावतीने युनियनचे मुंबई अध्यक्ष विजय शंकर मिश्रा यांनी परिवहन मंत्री अनिल परब आणि कामगार नेते अभिजीत राणे यांचे आभार मानले आहेत.














8 views0 comments
bottom of page