धडक कामगार युनयिनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबई आदिवासी कांग्रेसचे अध्यक्ष सुनिल कुंभरे यांच्याव्दारे आयोजित केलेल्या तिरंगा गौरव यात्रेत सहभागी झाले होते.
गोरेगाव पूर्व, मुंबई येथील आरे कॉलनीतील आदर्श नगर, नवजीवन नगर मार्गे तिरंगा गौरव यात्रेचा नागेश्वर मंदिर येथे समारोप झाला. तिरंगा गौरव यात्रेत अंगणवाडी सेविका, शालेय विद्यार्थी, स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. सुनिधी कुंभरे, श्रद्धा शिंदे, संतोष चव्हाण, दिपक शिंदे, झुल्लुर यादव, रफिक शेख, धर्मराज ठोकला आदि यात्रेत सहभागी झाले होते.
Comments