◆ धडक कामगार युनियन व अर्नाळा मच्छीमार विविध कार्यकारी संस्थेची बैठक संपन्न
-------------
◆ बैठकीत सकारात्मक चर्चा
-------------
वसई : धडक कामगार युनियन व अर्नाळा मच्छीमार विविध कार्यकारी संस्थेची कामगारांच्या विविध समस्या व प्रश्न संदर्भात सकारात्मक बैठक पार पडली यावेळी कामगारांच्या विविध मागण्या संचालक मंडळासमोर युनियनच्या माध्यमातून पगारवाढ, प्रॉव्हिडंट फंड तसेच कामगारांना मिळणारे हक्क न्याय आदी विषयांवर सकारात्मक चर्चा करून मागण्या मांडण्यात आल्या. बैठकीत धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे, युनियनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उत्तम कुमार, जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव, वसई (प.) सचिव रमेश पांडे आदी उपस्थित होते तर संस्थेकडून संस्थेचे अध्यक्ष रोहिदास पाटील, जनरल मॅनेजर सेविका निजाई व संचालक मंडळ उपस्थित होते.
कामगार नेते अभिजीत राणे यांनी यावेळी बोलताना, कामगारांना अन्यायाची वागणूक मिळणार नाही त्यांना त्यांचा मानसम्मान मिळेल अशा प्रकारे संचालक मंडळाने पितातुल्य या भावनेतून कामगारांकडे पाहावे व तशी वागणूक द्यावी असे यावेळी ते म्हणाले.
उत्तम कुमार यांनी सांगताना, कामगारांना संचालक मंडळाचे सहकार्य गरजेचे असून प्रत्येक जण एकमेकांवर अवलंबून आहे. असे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव यांनी कामगारांच्या समस्या वाचून संस्थेच्या लक्षात आणून दिल्या.
कामगार नेते अभिजीत राणे यांनी बैठकनंतर कामगारांची भेट घेऊन त्यांना संपुर्ण न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.









Commentaires